पुणे : कोरोना, स्वाईन फ्लूसह डेंग्यूनेही वाढवली भीती

पुणे : कोरोना, स्वाईन फ्लूसह डेंग्यूनेही वाढवली भीती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कीटकजन्य, विषाणूजन्य आजारांना आमंत्रण मिळत आहे. कोरोनाचे रुग्ण तीन-चार दिवसांपासून कमी होत असले तरी स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. स्वाईन फ्लूसह आता डेंग्यूनेही पुणेकरांची भीती वाढवली आहे. येत्या 1 ते 20 जुलै या काळात शहरात 50 रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे. परिसरातील साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यूची शक्यता वाढत आहे. जानेवारी ते जूनपर्यंत शहरात दर महिन्याला साधारणपणे 20-30 रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान होत होते. 1 जुलैपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 1098 रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली. त्यापैकी 440 संशयित रुग्णांची नोंद झाली, तपासणीनंतर 50 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

काय काळजी घ्यावी?
इमारतीवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा.
घराभोवती पावसाचे पाणी साठू देऊ नका.
परिसरातील डबकी बुजवा किंवा वाहती करा.
घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्या.
पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी रोज बदला
सॅप्टिक टँकच्या पाईपला जाळ्या बसवा.
घराभोवती प्लास्टिक बाटल्या, नारळाच्या करवंट्या, खराब टायर्स अशा खोलगट वस्तूमध्ये पाणी साचू देऊ नये.
कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यास सहकार्य करा.

डेंग्यू आकडेवारी
पुणे महापालिका, आरोग्य विभाग (स्तोत्र)
महिना        संशयित         पॉझिटिव्ह
जानेवारी      160                  16
फेब्रुवारी      117                  28
मार्च           128                   22
एप्रिल           84                   42
मे                58                   18
जून            154                   17
जुलै            440                  50

पावसाळ्यात अतिसार, विषाणूजन्य आजार, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, डेंग्यू, कोरोना आदी आजारांचे रुग्ण वाढत आहेत. जुलै महिन्यात डेंग्यूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत 1200 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, 56 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
                        – डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news