

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सच्या वतीने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी जीएसटीबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज होणार्या देशव्यापी बंदमध्ये पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघ व कॉन्फरडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) सहभागी होणार नाही,फ असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे म्हणाले, ङ्गवस्तू आणि सेवाकर आकारण्यासंदर्भात देश पातळीवर विचार होणे आवश्यक आहे. कायद्यासंदर्भात सीतारामन यांच्याशी चर्चा सुरू आहे. याखेरीज राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय, तसेच महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांच्यासोबत प्रत्येक राज्यांच्या प्रतिनिधींच्या चर्चा व बैठका सुरू आहेत.
जीएसटी आकारण्यात येऊ नये याबाबत राज्य, तसेच जिल्हा व्यापारी प्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. सरकारसोबत चर्चा सुरू असल्याने आजच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार नसून, येत्या काळात केंद्रातील संघटनेने भारत बंदचे आवाहन केल्यानंतर स्थानिक पातळीवरील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातील, तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही निवंगुणे यांनी नमूद केले.