पुणे : कालव्याचे अस्तरीकरण थांबविण्याच्या अजित पवार यांची सूचना

पुणे : कालव्याचे अस्तरीकरण थांबविण्याच्या अजित पवार यांची सूचना

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा : 'लोकभावनेची दखल घेत निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम थांबविण्याची सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित विभागाला केली आहे,' अशी माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
पवार यांनीच काम बंद करण्याच्या सूचना दिल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अजित पवार यांच्यापर्यंत निरा डावा कालवा अस्तरीकरणाबाबतच्या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या भावना पोहचल्या आहेत.
पवार कुटुंबीयांनी आजपर्यंत शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्यांच्या विरोधी किंवा त्यांचे नुकसान होईल असे कोणतेही काम केलेले नाही. पवार यांच्यासोबत फोनवरून बोलणे झाले असून, त्यांना याबाबत जनभावना सांगितली आहे. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अस्तरीकरणाचे काम थांबविण्याची सूचना संबंधित शासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

या कामास स्थगिती दिल्याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व शेतकर्‍यांनी पवार यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news