पुणे : ओमायक्रॉन उपप्रकारांच्या रुग्णांत वाढ

पुणे : ओमायक्रॉन उपप्रकारांच्या रुग्णांत वाढ

पुणे : जनुकीय क्रम निर्धारणा अर्थात जीनोम सिक्वेन्सिंगच्या ताज्या अहवालानुसार बीए 2.75 या उपप्रकाराचे प्रमाण सध्या वाढताना दिसत असून, बीए 2.38 या पूर्वी सर्वाधिक प्रमाणात असणार्‍या उपप्रकाराचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यात इन्साकॉग अंतर्गत सात प्रयोगशाळांमार्फत कोरोना विषाणूचे जनुकीय क्रम निर्धारण करण्याबाबतचे सर्वेक्षण नियमित सुरू आहे. मागील दहा दिवसांत बीए 4 आणि बीए 5 चे नवे 73, बी.ए. 2.75 चे नवे 209 रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांचा साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए 4 आणि बीए 5 रुग्णांची संख्या 348 तर बीए 2.75 रुग्णांची संख्या 459 झाली आहे.

जिल्हानिहाय बीए 4 आणि 5 चे रुग्ण
पुणे – 235, मुंबई – 72, ठाणे-16, रायगड आणि नागपूर – प्रत्येकी 7, सांगली-6, पालघर-4, कोल्हापूर-1
बीए 2.75 चे रुग्ण
पुणे – 234, मुंबई – 131, नागपूर – 44, यवतमाळ -19, चंद्रपूर-17, सोलापूर – 9, अकोला आणि वाशीम-प्रत्येकी-2, सांगली-1

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news