पुणे : इंद्रायणी एक्स्प्रेस 25 दिवसांकरिता रद्द

पुणे : इंद्रायणी एक्स्प्रेस 25 दिवसांकरिता रद्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण कोरोना काळात बंद असलेली आणि नुकतीच सुरू करण्यात आलेली पुणे-सोलापूर एक्स्प्रेस (इंद्रायणी एक्स्प्रेस) 25 दिवसांकरिता रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी सुरू करून अवघे पाच ते सहा दिवसच झाले होते. त्यातच पुन्हा ही गाडी बंद झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाने भिगवण-वाशिंबेदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे पुणे-सोलापूर एक्स्प्रेस म्हणजेच इंद्रायणी एक्स्प्रेससह पुणे-सोलापूर डेमू गाडीदेखील रद्द केली आहे. तर, एक रेल्वे गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पुणे-सोलापूर डेमू गाडी दिनांक 24 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत रद्द राहणार आहे. तर, पुणे-सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस 25 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत रद्द राहील. तसेच, भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस 26 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत दर मंगळवारी भुवनेश्वरहून सुटणार आहे. पुणे-भुवनेश्वर साप्ताहिक एक्स्प्रेस दर गुरुवारी पुण्याहून सुटणारी गाडीदेखील रद्द राहील. तिहेरी साप्ताहिक गाडी दादर-पंढरपूर एक्स्प्रेस 24 जुलै ते 31 आणि 25 जुलै ते 1 या कालावधीसाठी दादरहून सुटणारी पंढरपूर-दादर एक्स्प्रेस रद्द राहील. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी विशाखापट्टणम एक्स्प्रेस पुण्याहून रूपांतरित मार्गाने पुणे-मिरज-कुर्डुवाडी-वाडी मार्गे धावेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news