पुणे : आयुक्तांच्या हस्ते ‘स्टार्टअप’ यात्रेचा प्रारंभ

पुणे : आयुक्तांच्या हस्ते ‘स्टार्टअप’ यात्रेचा प्रारंभ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नावीन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचा प्रारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला. विधानभवन येथून फिरत्या एलईडी डिस्प्ले व्हॅनला झेंडा दाखवून राव यांनी या यात्रेचा प्रारंभ केला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल-लोढा, कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आदी उपस्थित होत्या.

डिस्प्ले व्हॅनद्वारे जनजागृती
महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण, यात्रेबाबतची संपूर्ण माहिती व उद्देश, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्यांचे पैलू तसेच कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती या एलईडी डिस्प्ले व्हॅनवरून प्रदर्शित केली जाणार आहे. स्टार्टअप यात्रा 17 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यात दाखल होत असून, याअंतर्गत डिस्प्ले व्हॅनच्या माध्यमातून 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत प्रचार, प्रसिद्धी होणार आहे. या वेळी नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना नोंदवू शकतील.

उत्कृष्ट नवकल्पनांना पारितोषिक
उत्कृष्ट नवकल्पनांच्या सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरावर पहिल्या क्रमांकाचे 25 हजार रुपये, दुसर्‍या क्रमांकाचे 15 हजार रुपये, तर तिसर्‍या क्रमांकाला 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. विभागस्तरावरील सर्वोत्कृष्ट उद्योजकाला विभागाचा स्टार्टअप हिरो म्हणून आणि विभागीय सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकेला प्रत्येकी 1 लाख रुपयाचे रोख बक्षिीस मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news