पुणे : आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील यांची पुनर्नियुक्ती

पुणे : आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील यांची पुनर्नियुक्ती
Published on
Updated on

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तपदी विद्यमान आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांचीच 7 ऑगस्ट 2022 पासून पुनर्नियुक्ती करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. डॉ. जगदीश पाटील यांची सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून 1 ऑगस्ट 2019 रोजी नियुक्तीचे आदेश झाले होते.

ही नियुक्ती 3 वर्षांसाठी होती. त्यांनी 7 ऑगस्ट 2019 रोजी आयुक्तपद धारण केलेले आहे. आता शासनाने त्यांना त्याच पदावर पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. पाटील हे मे 2024 मध्ये वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करीत आहेत. तोपर्यंत ते या पदावर कायम राहतील. डॉ. पाटील यांनी यापूर्वी कोकण विभागीय आयुक्त, बेस्टचे सरव्यवस्थापक, पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक या पदावर काम केलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news