पुणे : आयटीआयला पहिल्या फेरीत 92 हजार प्रवेश

पुणे : आयटीआयला पहिल्या फेरीत 92 हजार प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी जाहीर करण्यात आली असून पहिल्या यादीत तब्बल 92 हजार 140 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. राज्यभरात यंदा आयटीआयमध्ये 1 लाख 49 हजार 292 जागा आहेत, त्यापैकी शासकीय आयटीआयमध्ये 93 हजार 676 आणि खासगी आयटीआयमध्ये 55 हजार 616 जागा आहेत. या जागांवर यंदा 3 लाख 8 हजार 439 इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 48 हजार 796 विद्यार्थ्यांनी ट्रेड ऑप्शन भरले होते.

त्यापैकी 92 हजार 206 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश देण्यात आले आहेत. यामध्ये 75 हजार 799 शासकीय जागावर तर 16 हजार 341 खासगी आयटीआयच्या जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. प्रथम प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना निवड पत्र (अलॉटमेन्ट लेटर) त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. प्रथम प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांने सादर केलेल्या पंसतीक्रमांच्या प्रथम विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

एकूण जागा
शासकीय आयटीआय 89,616
खासगी आयटीआय 47,684
एकूण 1,37,300
एकूण आलेले अर्ज 2,58,628
पसंतीक्रम भरलेले विद्यार्थी 2,40,799
पहिल्या यादीत प्रवेश
शासकीय आयटीआय 67,212
खासगी आयटीआय 12,994
एकूण 80

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news