पुणे : तरुणीशी मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील सत्यवान आल्हाट (22, रा. गांधीनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 20 वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते ऑगस्ट 2022 दरम्यान संशयित आरोपीच्या राहत्या घरी आणि तळेगाव ढमढेरे येथील त्याच्या चुलतीच्या घरी घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे.