

मंचर, पुढारी वृत्तसेवा : नोकरी लावतो म्हणून आंबेगाव तालुक्यातील तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्या भोंदूबाबास घोडेगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महंत बेलनाथ महाराज (गोरक्षनाथ आश्रम, कमलजामाता मंदिर, राजेवाडी, ता. आंबेगाव) यांची तसेच एकाची प. पू. महंत 108 श्री स्वामी रामानंदजी महाराज तथा विनायक पांडुरंग उईके (रा. संत भाकरे महाराज सेवा आश्रम, श्री क्षेत्र बर्डी, पो. खराडी, ता. नरखेडा, जि. नागपूर) यांनी नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून 2 लाख 51 हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीस लावले नाही.
फसवणुकीबाबत घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानुसार आरोपीस नागपूर येथे जाऊन घोडेगाव पोलिसांनी अटक केली. सदर कामगिरी घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, उपनिरीक्षक अनिल चव्हाण, कर्मचारी नीलेश तळपे, सोमनाथ होले यांनी केली.