आंबवडे येथील दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला ब्रिटिशकालीन झुलता पूल. (छाया : अर्जुन खोपडे)
आंबवडे येथील दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला ब्रिटिशकालीन झुलता पूल. (छाया : अर्जुन खोपडे)

पुणे : आंबवडेतील ब्रिटिशकालीन झुलता पूल बंद

भोर : पुढारी वृत्तसेवा : आंबवडे (ता. भोर) येथील श्री क्षेत्र नागेश्वर मंदिराकडे जाणारा ब्रिटिशकालीन झुलत्या पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल 8 ते 10 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच रोहिदास जेधे यांनी दिली.

आंबवडे गावात जाण्यासाठी सर जिजिसाहेब सस्पेन्शन नावाचा झुलता पूल आहे. या पुलाला असलेल्या लोखंडी प्लेटा गंज पडल्याने जागोजागी सडल्या आहेत. परिणामी पूल धोकादायक होत चालला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीसाठी चार दिवसांपासून पूल बंद ठेवण्यात आला असल्याचे आंबवडेचे सरपंच रोहिदास जेधे यांनी सांगितले.

हा झुलता पूल पर्यटकांसाठी आकर्षक असून, या पुलाची 4 फूट रुंद, तर 150 फूट लांबी असून, सन 1936 मध्ये या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूस कमानी आहेत. हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी आपल्या आई श्रीमंत जिजिसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला गेला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी त्या वेळी 10 हजार रुपये खर्च आला होता. तर या पुलाचे उद्घाटन 15 नोव्हेंबर 1937 रोजी मिरजेचे राजे सर गंगाधरराव पटवर्धन यांचे हस्ते झाले होते.

या झुलत्या पुलावरून नेहमीच वर्दळ असते. श्री नागेश्वर मंदिर, आंबवडे गाव, आंबवडे आरोग्य केंद्र तसेच बँकेत पायी जाताना नागरीक या पुलाचा वापर करत असतात.

logo
Pudhari News
pudhari.news