पुणे : अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज प्रसिद्ध

पुणे : अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज प्रसिद्ध
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची यादी बुधवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध होणार आहे. या प्रवेश यादीत महाविद्यालयात जाहीर होणार्‍या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत (दि. 6) सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे आणि शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

प्रवेश प्रक्रियेतील एकूण अर्जांच्या तुलनेत महाविद्यालयांमध्ये जागा मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होण्याची शक्यता आहे. अकरावी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महानगर क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेत अर्जातील भाग 1 आणि 2 पूर्ण भरून सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रवेश यादीत समावेश केला जाणार आहे.

पुणे-पिंपरी-चिंचवडमधील कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी 86 हजार 586 जागा असून, त्यासाठी 69 हजार 125 विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश यादीकडे लक्ष लागले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये : 317
एकूण प्रवेशक्षमता : 111430
एकूण नोंदणी : 100953
कोटा प्रवेशक्षमता : 24844
कोटांतर्गत प्रवेश : 4359
कॅप प्रवेशक्षमता : 86586
कॅपअंतर्गत अर्ज : 69125

महत्त्वाच्या सूचना…
प्रवेशाच्या यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय जाहीर झाल्यावर प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय जाहीर झाल्यावरही प्रवेश न घेणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंध करण्यात येईल. पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त इतर महाविद्यालये जाहीर झाल्यास विद्यार्थी अधिक चांगले महाविद्यालय मिळविण्यासाठी पुढील फेरीपर्यंत थांबू शकतात. प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडीद्वारे 'प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन' या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news