पुणे : 928 शाळा अवघड क्षेत्रात, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमधील शाळांचा समावेश

पुणे : 928 शाळा अवघड क्षेत्रात, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमधील शाळांचा समावेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नियतकालिक बदल्या आता नव्याने विकसित केलेल्या अ‍ॅपद्वारे ऑनलाइन होणार आहेत. जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेसाठी अवघड क्षेत्रातील शाळांची संख्याही 928 निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमधील शाळा सर्वाधिक अवघड क्षेत्रात समाविष्ट आहेत.

बदल्यांपूर्वी अवघड शाळा क्षेत्र आणि सोप्या शाळा क्षेत्र यांची निश्चिती करण्यास सांगण्यात आले होते. त्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने पूर्ण केली आहे. प्रशासकीय बदलीस पात्र शिक्षकांच्या यादींसाठी सेवाज्येष्ठता, एका तालुक्यात असणारी सेवा यांचाही तपशील शिक्षण विभागाने तयार करून कार्यवाही पूर्ण केली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक अवघड ठिकाणच्या शाळा या मावळ तालुक्यात 171 ठिकाणी आहेत. त्या पाठोपाठ खेड तालुक्यात 138, मुळशीमध्ये 128, तसेच जुन्नरमध्ये 112, तर आंबेगाव तालुक्यात 110 शाळांचा समावेश आहे. तसेच, अवघड क्षेत्राच्या निकषांनुसार 571 क्षेत्रांची संख्या निश्चित केली आहे.

जिल्ह्यातील बारामती, दौंड, हवेली, इंदापूर आणि शिरूर या तालुक्यांतील सर्व शाळा अवघड क्षेत्रामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत. नव्या ऑनलाइन बदलीप्रक्रियेमध्ये शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्जामध्ये भरलेली माहिती इतर सर्व शिक्षकांना पाहणे शक्य होणार आहे. त्या बदलीप्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्रे असणार्‍या शाळांची यादी आणि संख्या निश्चित केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news