पिंपरी : हुश्श..! एकदाचा निकाल लागला

पिंपरी : हुश्श..! एकदाचा निकाल लागला
Published on
Updated on

पिंपरी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शुक्रवार (दि22) सकाळी जाहीर करण्यात आला. तर, दुपारी दोनच्या सुमारास दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा होती.

हा निकाल लागल्यानंतर हुश्श..! एकदाचा निकाल लागला, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमध्ये उमटली. सीबीएसईच्या संकेतस्थळावर हा निकाल ऑनलाइन पाहण्याची सुविधा होती. बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, स्कुल क्रमांक आणि अ‍ॅडमिट कार्ड क्रमांक अशी माहिती भरावी लागत होती. तर, दहावीचा निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, स्कुल क्रमांक, जन्मतारीख आणि अ‍ॅडमिट कार्ड क्रमांक एवढी माहिती भरल्यानंतर निकाल पाहता येत होता.

एसएमएस आणि डिजीलॉकरच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची सुविधा बोर्डाकडून करुन देण्यात आली होती.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या. दहावीची परीक्षा ही 26 एप्रिल ते 24 मे या कालावधीत घेण्यात आली. तर, बारावीची परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत झाली. त्यामुळे राज्य मंडळाच्या आधी जाहीर होणारा सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल यंदा उशिराने जाहीर झाला.

गुणवंत विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर मित्र परिवार, नातेवाईक यांच्याकडून फोनद्वारे, सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा दिवसभर वर्षाव सुरु होता. फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स अ‍ॅप आदी माध्यमांवर गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news