पिंपरी : सत्तर सीसीटीव्ही तपासून ठोकल्या आरोपीला बेड्या

पिंपरी : सत्तर सीसीटीव्ही तपासून ठोकल्या आरोपीला बेड्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चॉकलेटचे आमिष दाखवून सातवर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या सोळा तासांत बेड्या ठोकल्या. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील एकूण सत्तर सीसीटीव्ही फुटेज तपासले. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.

अलिम मुसा शेख (27, रा. काळेवाडी, मुळगाव शिरूर ताजमहल, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने थेरगाव येथील बापुजीबुवा उद्यानात खेळणार्‍या सात वर्षांच्या अल्पवयीन मुलास चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत वाकड पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी परिसरातील 70 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या फुटेजची पाहणी केली. यातील एका फुटेजवरून आरोपी तरुणाची ओळख पटली.

त्यानुसार, आरोपी राहत असलेल्या परिसरात सापळा सापळा रचून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, सोमवारी (दि. 18) आरोपी शेख याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेख याच्यावर यापूर्वी पिंपरी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे, संतोष पाटील, सहायक निरीक्षक संभाजी जाधव, उपनिरीक्षक अवधूत शिंगारे, पोलिस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदु गिरे, दीपक साबळे, स्वप्नील खेतले, बंडु खाडे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, तात्यासाहेब शिंदे, भास्कर भारती व अजय फल्ले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news