पिंपरी : शाळा महाविद्यालय परिसरात आता पोलिसांची गस्त

थर्टीफर्स्ट
थर्टीफर्स्ट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोर मंडळी विद्यार्थिनींचीछेड काढत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त कार्यालकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्त सुरू करण्यात आली आहे. याबाबत अंकुश शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीम महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासह खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा मोठ्या संख्येने आहेत. तसेच, महाविद्यालये देखील आहेत. यामध्ये विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय आहे.
शाळा, महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात मोठी गर्दी होते.

यात काही तरुण व नागरिक रेंगाळतात. तसेच, काही टवाळखोरांचाही वावर तेथे असतो. त्यांच्याकडून विद्यार्थीनी तसेच महिलांची छेड काढण्याचा प्रकार होतो. यातील काही प्रकरणे पोलिसांकडे येतात. गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते. मात्र, असे प्रकार घडूच नयेत यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त घालण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

इथे करा संपर्क…
छेडछाडीच्या घटना किंवा अनुचित प्रकार देखील आता सर्वसामान्य नागरिकांना रोखता येणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन 112 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा पोलिसांच्या नियंत्रण कक्ष 020-27352500 या क्रमांकावर फोन करून किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news