पिंपरी : वैविध्यपूर्ण दिवे, पणत्या, लायटिंगच्या माळांचा झगमगाट

पिंपरी : वैविध्यपूर्ण दिवे, पणत्या, लायटिंगच्या माळांचा झगमगाट
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या वस्तूंचा सध्या बाजारपेठेत झगमगाट दिसत आहे. दिवे, पणत्या, लायटिंगच्या माळांची खरेदी सध्या जोरावर आहे. थ्रेड बॉल, मेटलच्या वेगवेगळ्या आकारांतील माळा लाइटच्या माळांमध्ये फुले, सोनेरी कागद आणि सजावटीचे साहित्य टाकून एकत्रित अशी माळदेखील बाजारात उपलब्ध झाली आहे. या प्रकारच्या माळांचे दर 200 पासून ते 250 रुपयांपर्यंत आहेत. देशी लाईटसच्या प्रकारामध्ये यंदा वैविध्य पाहायला मिळते. यात रंगीबेरंगी थ्रेड बॉल, मेटलचे वेगवेगळ्या आकारांतील लाईटस बाजारात दाखल झाले आहेत. याच्या किंमती साधारण 300 रुपयांपासून सुरू आहेत.

एलईडी दिव्यांची तोरणे, झुंबर
पिंपरी चिंचवड बाजारपेठेची परिस्थिती पाहता बहुतेक व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या लायटिंगच्या माळा, लाइटची कृत्रिम फुले, एलईडी लाईट बसविलेली तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. याची किंमत 300 रूपयांपासून पुढे आहे. तसेच लोकर आणि कापडी झिरमिळ्यांनी बनविलेले झुंबर हा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

मेटलच्या माळा
थ्रेड बॉल प्रकारांत रंगांचे वेगळेपण असल्याने यांना चांगली मागणी आहे. तर मेटलच्या डिझायनर लायटिंगमध्ये स्टार, गोलाकार, बदाम, असे आकर्षक आकार पाहायला मिळत आहेत. या सोनेरी आकारातील मेटल लाईट यंदा भाव खाऊन जात आहेत. लायटिंग माळा 300 ते 500 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

लाईटची समई
यंदा बाजारात लाईटच्या समई उपलब्ध आहेत. यामध्ये छोट्या आणि मोठ्या आकारातील समई विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. तसेच यामध्ये लाईट्स असलेला फिरता कलशही उपलब्ध आहे.

विद्युत दिवे
महागाईचा विचार करता रोषणाईमुळे विजेचे बिल कमी यावे, असे दिवे सध्या बाजारात आहेत. विविध प्रकारचे पण कमीतकमी विजेवर चालणारे दिवे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news