पिंपरी : लग्नात मानपान न केल्याने विवाहितेचा छळ

पिंपरी : लग्नात मानपान न केल्याने विवाहितेचा छळ
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: लग्नात मानपान न केल्याने विवहितेचा शारीरिक, मानसिक छळ केला. ही घटना 18 जुलै 2021 ते 9 जून 2022 या कालावधीत वाल्हेकरवाडी, पुरंदर येथे घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी संगनमत करून तुझ्या आईने लग्नात मानपान केला नाही, असे बोलून अपमान करत फिर्यादीला मानसिक त्रास दिला. इच्छा नसताना पतीने बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news