पिंपरी : मुख्य बाजारपेठेतच डीपी बॉक्स उघडा

पिंपरी : मुख्य बाजारपेठेतच डीपी बॉक्स उघडा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी मुख्य बाजारपेठेतून भीमनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर महावितरणचा डीपी बॉक्स उघडा आहे. त्यातील विद्युत तारा उघड्यावर पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिव डेअरीच्या पुढे भीमनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर महावितरणचा डीपी बॉक्स उघडा आहे. त्यातील विद्युत तारा उघड्यावरच पडल्या आहेत.

सध्या पावसाळा सुरु असल्याने येथून ये-जा करणार्‍यांच्या जीवाला या उघड्यावरील विद्युत तारांमुळे धोका निर्माण होवू शकतो.
या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे; तसेच या डीपीला त्वरित झाकण बसवावे व या ठिकाणी उघड्यावर पडलेल्या तारा हटवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news