पिंपरी : शेजारी राहणार्या व्यक्तीने महिलेचा विनयभंग करून तिच्या अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. ही घटना म्हांळुगे येथे शुक्रवारी (22 रोजी) रात्री पावणेनऊ वाजता घडली आहे. आरोपी पारस जेपाराम देवासी (वय 29, रा. महादेवी मंदिरामागे, म्हाळुंगे) याने शेजारी राहणार्या महिला फिर्यादीच्या अकरा वर्षीय मुलीस शिवीगाळ करून, तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
याबाबत मुलीच्या आईने विचारणा केली असता आरोपीने त्यांनाही अश्लिल भाषेत शिवीगाळ करून, त्यांचे वस्त्र फाडले. म्हणून फिर्यादीने हिंजवडी पोलिसांत शनिवारी पहाटे पावणे तीन वाजता फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर कलम 354, 509 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यातील कलम 11, 12 नुसार गुन्हा नोंदविला आहे.