पिंपरी : बाप्पासाठी सुंदर आकर्षक, पर्यावरणपूरक मखर

कागद, पुठ्ठा, लाकूड, फोमपासून बनविलेले मखर.
कागद, पुठ्ठा, लाकूड, फोमपासून बनविलेले मखर.
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्यामुळे नागरिक गणेशोत्सवाची तयारी करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षापासून थर्माकोल व प्लास्टिक मखरांवर बंदी असल्यामुळे बांबू, लाकूड, कागद, कार्डबोर्ड पेपर, कापड, फोम आणि पुठ्ठ्यापासून बनविलेले मखर बाजारात उपलब्ध झाले आहेत. बाजारात 700 रुपयांपासून ते साडेसहा हजारपर्यंत त्याच्या किंमती आहेत. यावर्षी रंग आणि इतर सजावट साहित्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तसेच त्यावर जीसएसटी असल्याने मखरांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

कापडी मखर
कापडी मखरांमध्ये झालर लावलेल्या, विविधरंगी लेस, टिकल्या वापरून तयार केलेली मखरे दोन फुटापासून ते सहा फुटांपर्यंत उपलब्ध आहेत. विविधरंगातील ही मखरे घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. घडी करून ठेवता येत असल्यामुळे जागा कमी लागते तसेच वॉशेबल असल्याने वापण्यास सोयीस्कर आहे. तसेच मखर तयार करण्याासाठी कापड ही विक्रीस आहे. तसेच मखराच्या सजावटीसाठी लागणारे सामान देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

लाकडी मखर
लाकडी मखरांमध्ये लाकडाच्या पातळ पट्ट्या वापरल्या जातात. विविध आकाराच्या चौकटी आणि आकार वापरुन हे मखर तयार केले जाते. फुलांनी, माळांनी त्याची सजावट केली जाते. यामध्ये लाकूड आणि कापड वापरुन विविधरंगी फुलांनी सजविलेली मखर यांना नागरिकांची पसंती आहे.

कार्डबोर्ड, पुठ्ठ्यापासून बनविलेले मखर
आकर्षक रंग व नक्षीकाम केलेले कार्डबोर्ड पेपर व पुठ्ठ्यापासून बनविलेले मखर लक्ष वेधून घेत आहेत. अ‍ॅक्रॅलिक कलर व स्पार्कल वापरून मखरांना अतिशय आकर्षक करण्यात आले आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि उपनगरातील बाजारात देखील अशा प्रकारची मखर विक्रीस ठेवण्यात आली आहेत.

फोमशीटपासून तयार केलेले मखर
फोमशीटपासून तयार केलेले रेडिमेड आणि फोल्डिंग करता येणारे विविध प्रकारचे सुंदर अणि आकर्षक असे मखर बाजारात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सिंहासन, किल्ल्यांच्या मंदिरांच्या व गडांच्या अशा विविध प्रकारच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच यामध्ये संपूर्ण खडे, आरसे, टिकल्यांनी सजविलेले आणि पूर्ण लाईटिंग केलेल्या या मखरांना जास्त सजावटीची गरज नाही. कारण यामध्ये वापरलेले आकर्षक स्पार्कल कलर, कुंदन, टिकल्या यामुळे हे बघतानाच आकर्षक दिसतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news