पिंपरी : बाप्पाच्या विसर्जनासाठी वाहतुकीत बदल

पिंपरी : बाप्पाच्या विसर्जनासाठी वाहतुकीत बदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गुरुवारी (दि. 1) याबाबतचे आदेश दिले आहेत.

हिंजवडी वाहतूक विभाग
टाटा टी जंक्शन चौक – टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रिक सर्कल चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग – टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रिक सर्कल चौकाकडे जाणारी वाहतूक लक्ष्मी चौकाकडून इच्छित स्थळी जाता येईल.
जॉमेट्रिक सर्कल चौक – जॉमेट्रिक सर्कल चौकाकडून मेझा व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद.
पर्यायी मार्ग – जॉमेट्रिक सर्कल चौकाकडून मंझा व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक टाटा टी जंक्शन चौकाकडे जाऊन लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

मेझा 9 चौक – मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौकाकडे वाहतूक जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
शिवाजी चौक – शिवाजी चौकाकडून जांभुळकर जिम, वाकड नाका, हिंजवडी गावठाणकडे
जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – शिवाजी चौकाकडून जांभुळकर जिम, इंडियन ऑइल चौक, हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक विप्रो सर्कल फेज एक चौक, जॉमेट्रिक, टाटा टी जंक्शन चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
कस्तुरी चौक – कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौक हिंजवडीकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौक हिंजवडीकडे जाणारी वाहतूक विनोदे वस्ती कॉर्नर, लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

जांभुळकर जिम चौक – शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाणारी वाहने इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक पुढे विनोदे वस्ती कॉर्नर चौक मार्गे जातील.
इंडियन ऑईल चौक – जांभुळकर जिम चौक व शिवाजी चौकाकडे वाहनांना जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – जांभुळकर जिम चौक व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहने कस्तुरी चौक मार्गे विनोदे वस्ती कॉर्नर चौक मार्गे जातील.

पिंपरी वाहतूक विभाग
पिंपरी चौकातून शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग – पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगरमार्गे तसेच मोरवाडीमार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर तेरेसा ब—ीजवरून काळेवाडीमार्गे जाता येईल.

काळेवाडी पुलावरून येणार्‍या वाहनांना डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी आहे.
पर्यायी मार्ग – काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गावरून इच्छित स्थळी जाता येईल.
पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग – पिंपरी चौकाकडून पिंपरी सर्व्हिस रोडने क्रोमा शोरूम समोरून इच्छित स्थळी जाता येईल.

या तारखांना वाहतुकीत बदल
पिंपरी वाहतूक विभागातील वाहतूक रविवारी (दि. 4), मंगळवारी (दि. 6), गुरुवारी (दि. 8) आणि शुक्रवारी (दि. 9) दुपारी चार ते रात्री बारापर्यंत वळविण्यात आली आहे. तर, हिंजवडी वाहतूक विभागात शुक्रवारी (दि. 9) दुपारी चार ते रात्री बारा वाजताच्या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news