पिंपरी : प्रभागरचनेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

पिंपरी : प्रभागरचनेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: नियमबाह्य व चुकीच्या पध्दतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रभागरचना केल्याचा आरोप करीत भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी (दि.12) सायंकाळी सुनावणी अपेक्षित आहे. नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने प्रभागरचना फोडणे, गोपनीयतेच्या भंग करणे, राजकीय हस्तक्षेप होणे, आरक्षणाबाबतच्या 275 हरकतींचा जाणूनबुजून विचार न करता दुर्लक्ष करणे, मतदार याद्या चुकीच्या पद्धतीने फोडणे असे अनेक मुद्दे मडिगेरी यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केले आहेत. या संदर्भात न्यायव्यवस्थेकडून नक्की न्याय मिळेल, अशी अपेक्षा मडिगेरी यांनी व्यक्त केली आहे.

मडिगेरी म्हणाले की, प्रारूप प्रभागरचनेनंतर आरक्षण बदलण्याची तरतूद नियमात नाही. मात्र, प्रभाग क्रमांक 2 मध्ये एससी आरक्षण नव्हते. जाणूनबुजून हेतुपुरस्सर कोणास तरी डोळ्यासमोर ठेवून यात एससी आरक्षण बदल केला. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 5 मधील आरक्षण हटविण्यात आले. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक यंत्रणेला वारंवार केलेल्या अनेक चुकांबद्दल देशातील सर्वोच्च न्याय संस्थेपुढे उत्तर द्यावे लागणार आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news