पिंपरी : पालेभाज्यांच्या दरात वाढ, कांदा मात्र स्थिर

पिंपरी : पालेभाज्यांच्या दरात वाढ, कांदा मात्र स्थिर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व मोशी येथील उपबाजारात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली होती. परिणामी सर्व पालेभाज्या व फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. तसेच, कांद्याची आवक घटल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली. पावसामुळे शेपू, कोथिंबीर व मेथीची आवक कमी झाल्यामुळे दरात वाढ झाली. घाउक बाजारात पंधरा ते वीस रूपये दराने शेपू व कोथंबीरीच्या गड्डीची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

कांद्याची आवक 415 क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्यापेक्षा 100 क्विंटलने आवक कमी झाली होती. तर बटाट्याची आवक 1161 क्विंटल एवढी झाली होती. तर लिंबांची आवक 29 क्विंटल एवढी झाली. टोमॅटोची आवक गेल्या आठवड्यापेक्षा 56 क्विंटलने वाढली असून, 335 क्विंटल एवढी आवक झाली होती. काकडीची 104 क्विंटल एवढी आवक झाली होती. घाउक बाजारात टोमॅटोला 10 ते 12 रूपये किलो तर काकडीला 15 ते 16 रुपये किलो एवढा भाव मिळाला.

फळभाज्यांची आवक 3065 क्विंटल एवढी झाली, तर विविध फळांची आवक 195 क्विंटल एवढी झाली.

पिंपरी भाजी मंडईतील पालेभाज्यांचे दर

पालक 25
कोथिंबीर 25
गावरान कोथिंबीर 30
मेथी 25
शेपू 25
कांदापात 20
पुदिना 20
मुळा 15
फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 30-35
बटाटा 30-35
लसूण 50 – 60
भेंडी 60
गवार 65-75
टोमॅटा 30
दोडका 50-60
हिरवी मिरची 60
कोल्हापुरी मिरची 70
दुधी भोपळा 45-50
लाल भोपळा 40
काकडी 30 – 35
कारली 60 -70
पडवळ 60
फ्लॉवर 40
कोबी 45
वांगी 35 – 40
भरताची वांगी 45-50
शेवगा 50-55
गाजर 25 – 30

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news