

पिंपरी : पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. ते थेट धरणाच्या दरवाजातून पाणी सोडले जाईल. सध्या वीज निर्मिती प्रकल्प बंद आहे. धरणातील सध्याचा पाणी साठा सुमारे सहा महिने पुरेल इतका आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी सांगितले.
यंदा आयुक्तांच्या हस्ते जलपूजन
पवना धरण क्षेत्रात संततधार कायम आहे. त्यामुळे येत्या 10 ते 15 दिवसांत धरण 100 टक्के भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. धरण 100 टक्के भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्याची जुनी परंपरा आहे. सध्या महापालिका बरखास्त असल्याने यंदा महापौरांच्या गैरहजेरीत जलपूजन होणार आहे. आयुक्त तथा प्रशासन राजेश पाटील यांच्या हस्ते जलपूजन होण्याची शक्यता आहे.