पिंपरी :  पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पिंपरी :  शहरातील पदपथांवर झालेली अतिक्रमणे हटविण्यात यावीत. तसेच, शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी या मागण्या केल्या आहेत.

त्यांनी याबाबत म्हटले आहे, प्रत्येक प्रभागनिहाय कचरा संकलन मोहीम राबवावी. तसेच, शून्य कचरा उपक्रम राबविण्यात यावा. खंडित वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यात यावी, रस्त्यांची कामे योग्य वाहतूक व्यवस्थापनासह वेळेत पूर्ण करण्यात यावी, पार्किंगचा जाणवणारा प्रश्न लक्षात ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही अशा पद्धतीने भाजी मंडईचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

लोकांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, वाकड उड्डाणपुलावर स्कायवॉक करण्यात यावा, मीटरनुसार ऑटोरिक्षा सुरू होतील, अशी व्यवस्था करावी, रावेत बंधारा ते वाकडपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात यावे, वाकड येथील जलकुंभाचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news