पिंपरी : नातेवाईक तरुणीशी बोलल्याने तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : नातेवाईक तरुणीशी बोलल्याने तरुणावर कोयत्याने वार
Published on
Updated on

पिंपरी : नातेवाईक तरुणीशी बोलत असल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री सव्वानऊच्या सुमारास धनगरबाबा मंदिराजवळ थेरगाव येथे घडली. ज्यूड उर्फ आकाश अल्बट जोसेफ, असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत रुपसिंग भाट (23, रा. धनगरबाबा मंदिराजवळ, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अजय ननवरे (25, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा चुलत भाऊ जखमी जोसेफ हा शुक्रवारी रात्री घराबाहेर मित्रांशी गप्पा मारत उभा होता. त्यावेळी आरोपीने कोयत्याने जोसेफ यांच्या डोक्यावर, चेहर्‍यावर वार करून गंभीर दुखापत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news