पिंपरी : शटर उचकटून चोरट्यांनी दवाखान्यातून पाचशे रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 14) मध्यरात्री कामगार नगर, पिंपरी येथे घडली. अतुल माणिकराव शिंदे (30, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगारनगर येथील हॅप्पी हेल्थ क्लिनिक मध्ये फिर्यादी व्यवस्थापक म्हणून काम करतात. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी दवाखान्याचे शटर एका बाजूने उचकटले. रिसेप्शनच्या काउंटरमधून चोरटयांनी 500 रुपयांची रोकड चोरून नेली.