पिंपरी : टेम्पोतील सहा लाख 20 हजारांचे स्टेनलेस स्टील चोरीला

crime
crime
Published on
Updated on

पिंपरी : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टेम्पोतून चोरट्यांनी सहा लाख 20 हजार रुपये किमतीचे स्टील चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री साडेअकरा ते शुक्रवारी सकाळी दहाच्या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली. मुकुंद मानसिंग पवार (54, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून त्यांनी स्टील असलेला टेम्पो गुरुवारी रात्री संत तुकाराम नगर येथील रस्त्याच्या बाजूला पार्क केला होता. दरम्यान, रात्रीच्या वेळी चोरट्यांनी टेम्पोतील सहा लाख 20 हजारांचे स्टेनलेस स्टील चोरून नेले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news