पिंपरी : ज्येष्ठ महिलेच्या पर्समधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा ऐवज दोन चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना शनिवारी (2 रोजी) दुपारी दीड वाजता पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री बँकेजवळ घडली आहे.
जैनाफ गुलाब आत्तार (वय 70, व्यावसायिक, रा. रमाबाईनगर झोपडपट्टी, पिंपरी) या मेडीकलमध्ये औषधी आणण्यासाठी गेल्या असताना दोन चोरट्यांनी धक्का देऊन त्यांची पर्स व दागिने चोरट्यांनी लंपास केले.