पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी दोघांना अटक

पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी दोघांना अटक

पिंपरी : अवैध गुटखा विक्री प्रकरणी वेगवेगळ्या कारवायांमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे या कारवाया करण्यात आल्या. गुंडाराम मांगीलाल सोळंकी (26, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ), कुमार राजू तेवर (रा. सोमाटणे फाटा, मावळ) यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुंडाराम याने त्याच्या घराशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट पाचने कारवाई करून 39 हजार 769 रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुंडाराम सोळंकी याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.दुसर्‍या कारवाईत अमोल वसंतराव भाकरे (28, रा. आकुर्डी), मयंक पाटील या दोघांच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अमोल याची आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ सिद्धेश्वर पानवाला नावाने टपरी असून त्याने टपरीत गुटखा ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून टपरीतून 23 हजार 608 रुपयांचा गुटखा जप्त करून अमोल भाकरे याला अटक केली. त्याने मयंक पाटील याच्याकडून गुटखा विक्रीसाठी आणल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news