

पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (दि. 21) दुपारी बावधन येथे ही कारवाई करण्यात आली. मुकेश बन्सीलाल पालीवाल (39, रा. बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई अमित जगताप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीने त्याच्या दुकानात विक्रीसाठी गुटखा ठेवला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून आरोपी मुकेश याला अटक केली. त्याच्याकडून नऊ हजार 840 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.