पिंपरी : काय ती दिलेली मतं… काय तो मनपाचा विकास; सांगवीतील फलक घेतोय लक्ष वेधून

पिंपरी : काय ती दिलेली मतं… काय तो मनपाचा विकास; सांगवीतील फलक घेतोय लक्ष वेधून

Published on

पिंपरी : राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटी येथे असताना आमदार शहाजी बापू पाटील यांचं काय डोंगार…. काय झाड …हा डायलॉग प्रचंड भाव खाऊन गेला. पिंपरी चिंचवड शहरात पावसाने रस्त्यांची जी वाट लागली आहे. त्यावर सांगवी येथे काय चिखल… काय लाईट …काय ते पैसे …काय ती दिलेली मतं … हा लावलेला फलक लक्ष वेधून घेत आहे.

सांगली येथील पवारनगर येथे हा फलक लावण्यात आला आहे. काय चिखल ….काय लाईट…. काय पाणी…. काय खड्डे…. काय पार्किंग…. काय सिमेंट रस्ता …सगळं कसं ओकेमधी हाय ! काय पैसे ….काय ती दिलेली मत आणि काय तो महापालिकेचा विकास …व्वा .. सगळं झकास.. अशी टीका त्यात करण्यात आली आहे. खाली पश्चाताप झालेला एक मतदार, पवारनगर, सांगवी, असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news