पिंपरी : काम सांगितल्याने मारहाण

पिंपरी : काम सांगितल्याने मारहाण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कंपनीत असताना काम सांगितल्याच्या रागातून चार कामगारांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी अमेझॉन कंपनीच्या गेटवर आंबेठाण येथे घडली. अनिकेत बंडू पोटे (22, रा. कडूस, ता. खेड), सूरज वारे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ओमकार शेवाळे, ओमकार भैय्ये, मिलिंद जाधव, लखन शेवाळे (सर्व रा. शेवाळवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि त्यांचा मित्र सुरज वारे कंपनीचे काम झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास कंपनीच्या बाहेर आले. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. कंपनीत काम सांगणारे तुम्ही कोण. आम्ही आमचे काम करतो. तुमची असली ढवळाढवळ कशाला करता, असे म्हणून आरोपी शेवाळे याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. दरम्यान, सुरज वारे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही दगडाने मारहाण केली. त्यांनतर शिवीगाळ करून आरोपी निघून गेले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news