

पिंपरी : चिंचवड येथे राहत असलेल्या एका सोळावर्षीय मुलास पिंपरी पोलिस स्टेशनसमोरून एका अज्ञात इसमाने फूस लावून पळविले.ही घटना 5 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी यांचा सोळा वर्षीय मुलगा पिंपरी पोलिस स्टेशन समोरून चिंचवडकडे जाणार्या मार्गात थांबला असताना, अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेले आहे. म्हणून महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात शनिवारी (25 रोजी) रा. पावणे नऊ वाजता फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.