पिंपरी : अनधिकृत फ्लेक्स तत्काळ हटवा

पिंपरी : अनधिकृत फ्लेक्स तत्काळ हटवा
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे लावलेले बॅनर, फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तत्काळ कारवाई करून ते हटविण्यात यावेत, असे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना बुधवारी (दि.30) दिले आहेत.

शहरात लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स काही व्यक्तींकडून फाडण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी अनधिकृत बॅनर,फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्स काढून टाकण्याबाबत पिंपरी पोलिस ठाण्याचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी त्यासंदर्भात स्वतंत्र आदेश जारी केला आहे.

शहरातील 1 ते 7 दिवसांसाठी ठराविक चौकांमध्ये पालिकेच्या जागेत अभिनंदन, वाढदिवस, सभारंभ, दहावा व इतर जाहिराती प्रसिद्धीसाठी तात्पुरत्या स्वरुपात ऑनलाइन परवाना दिला जातो. त्यावर नागरिक, राजकीय पक्ष, संस्था, व्यावसायिक किंवा कंपन्यांनी ऑनलाइन परवानगी घेऊन ठरलेल्या ठिकाणी फ्लेक्स लावावेत.
तर, अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये विनापरवाना लावण्यात आलेले बॅनर, फ्लेक्स तसेच, विद्युत खांबांवरील किऑक्स त्वरित काढण्यात यावेत, असे आदेश क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news