पालिकेकडून चोवीस तासांत नालासफाई!

पालिकेकडून चोवीस तासांत नालासफाई!

Published on

महर्षीनगर : पुढारी वृत्तसेवा : महर्षीनगरमधील आदिनाथ सोसायटीलगतचा नाला महापालिकेच्या नालासफाई कामात साफ न झाल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. महापालिका नालेसफाई अभियंता दीपक सोनवणे यांना संपर्क केला असता, त्यांनी त्यास प्राधान्य देऊन 24 तास पूर्ण होण्यापूर्वीच नाला सफाई करून घेतली.

पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई न झाल्याने या भागातील नागरिक नाल्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त होते. या नाल्यात असलेली ड्रेनेज नाल्यात फुटली असल्याने ड्रेनेज उघड्यावरच वाहत होते. नाला सफाई कामात हे काम होईल, असे स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानिकांना आश्वासित केले होते. पण, ते काम आजपर्यंत झाले नाही.

नागरिकांच्या तक्रारीला दाद मिळाली नाही, तेव्हा दै. पुढारीने याचा पाठपुरावा केला. त्याला प्रतिसाद देत अधिकार्‍यांनी नाला सफाईचे काम चोवीस तासांत पूर्ण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news