पालखीत अडीच लाख वारकर्‍यांची तपासणी

पालखीत अडीच लाख वारकर्‍यांची तपासणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आषाढी पालखी सोहळ्यातील 2 लाख 45 हजार 475 वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य तपासणी मोठ्या प्रमाणात झाली, परंतु कोविड प्रतिबंधक लसीकरण मात्र अतिशय कमी प्रमाणात झाले. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून चार पालखी सोहळ्यांतील एक हजार वारकर्‍यांना वेगवेगळे लसीचे डोस देण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज, संत चांगावटेश्वर महाराज पालख्या सोहळ्यांसाठी आरोग्य विभागाकडून आरोग्य पथके, रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तीस आरोग्यदूतांचे पथक, फिरत्या रुग्णवाहिका, पालखी तळ ओपीडी, रुग्णालये पथके तैनात केले होते. पालखी सोहळ्या दरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये 2 हजार 242 जण बाधित आढळले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news