पालखी सोहळ्यात रामकृष्ण मठ पुणे यांच्यातर्फे फिरते वाचनालय

पालखी सोहळ्यात रामकृष्ण मठ पुणे यांच्यातर्फे फिरते वाचनालय

बावडा : पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्वामी विवेकानंदांचे विचार तळागाळापर्यंत पोहचावेत, या हेतूने रामकृष्ण मठ पुणे यांच्यातर्फे फिरते वाचनालय ही संकल्पना राबविली जात आहे. या संकल्पनेस वारकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्रीकांतानंद महाराज व स्वामी मंत्रानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वामी विवेकानंद विचारदर्शन रथ' हा उपक्रम राबविला जात आहे.

यासाठी वाहनामध्ये वाचनालय साकारण्यात आले आहे. या वाचनालयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विवेकानंद विचारांची हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. नागरिकांना हवे असल्यास अतिशय स्वस्त दरात ही पुस्तके उपलब्ध आहेत, असे या फिरत्या वाचनालयासोबत असलेले संदीप शिंदे, विवेक नवले यांनी सांगितले. बावडा बाजारतळावर रविवारी (दि. 3) हे फिरते वाचनालय उपलब्ध होते.

सध्याच्या मोबाईलच्या युगात युवकवर्ग हा पुस्तकवाचनापासून दूर जात आहे. त्यामुळे नव्या पिढीत पुस्तक वाचण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून 'पुस्तके आपल्या दारी' हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत निरा-भीमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील व कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news