पालखी मार्गासाठी झाडांची कत्तल, जेजुरी ते निरा दरम्यानचा प्रकार

file photo
file photo

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : आळंदी- पंढरपूर या पालखी मार्गाच्या विस्तारीकरणात जेजुरी ते निरादरम्यान हजारो झाडांची कत्तल होणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. यामध्ये जेजुरी, वाल्हे दरम्यानच्या रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल सध्या सुरू आहे. या झाडांची कत्तल न करता त्याची दुसर्‍या ठिकाणी पुन्हा लागवड केली जावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. पुरंदर तालुक्यातून जाणार्‍या पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी ते निरा यादरम्यानच्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे.

मात्र, या रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाने ही झाडे काढून टाकून देऊ नयेत. तर या झाडांचे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी अमोल दुर्गाडे, महेश भुजबळ, दौंडजचे सरपंच सीमा भुजबळ आदींनी केली आहे.
ही झाडे साधारण सरसकट काढून फेकून दिली जात आहेत. ती फेकून न देता या झाडांची योग्य ठिकाणी लागवड केल्यास निसर्गाचे होणारे नुकसान टळेल. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळावे, असे साबळे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news