पानशेत रस्ता सोनापूरजवळ पुन्हा खचला; दरडी कोसळण्याचा धोका

सोनापूरजवळील पुणे-पानशेत रस्त्याच्या पुलाचा मोठा भाग मुसळधार पावसामुळे पुन्हा खचला आहे.
सोनापूरजवळील पुणे-पानशेत रस्त्याच्या पुलाचा मोठा भाग मुसळधार पावसामुळे पुन्हा खचला आहे.

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या तीरावरील सोनापूर व रुळे गावच्या हद्दीवरील पुणे- पानशेत रस्त्यावरील पुलाचा मोठा भाग पुन्हा खचला. तसेच ओसाडे व सोनापूर हद्दीवर डोंगराच्या दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन पानशेत भागाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात 12 जुलै रोजी सोनापूरजवळील रस्त्याचा भाग खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर ओसाडेजवळ तोडलेल्या डोंगराच्या मोठ्या दरडी रस्त्यावर कोसळल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी, अशी मागणी मावळा संघटनेचे पानशेत विभाग अध्यक्ष शंकरराव निवंगुणे यांनी केली आहे.

दरम्यान, बांधकाम विभागाच्या वतीने सोनापूरजवळ खचलेल्या पूल व रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रुळे येथील कार्यकर्ते आकाश कांबळे म्हणाले, पुलाची एक बाजू खचली आहे. त्यामुळे येथून ये-जा करताना वाहनचालकांना त्रासदायक होत आहे.

पानशेत रस्ता बनला धोकादायक
गेल्या दोन महिन्यांपासून दरडी तसेच रस्ता खचत असल्याने पानशेत रस्ता धोकादायक बनला आहे. दोन आठवडे पावसाने उघडीप दिल्याने वाहतूक सुरळीत होती. दरडी तसेच रस्ता खचत असल्याने खबरदारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा सज्ज केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news