पाणीटंचाईने डोळ्यांत पाणी! कात्रजसह समाविष्ट गावांमध्ये समस्या गंभीर

पाणीटंचाईने डोळ्यांत पाणी! कात्रजसह समाविष्ट गावांमध्ये समस्या गंभीर
Published on
Updated on
कात्रज :  एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाचा कडाका वाढला असून, कात्रजसह नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले असून, या परिसरात दर तीन दिवसांनी पाणी मिळत आहे.  दक्षिण पुण्याच्या उपनगर परिसरातील नव्याने समाविष्ट मांगडेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी या गावांमध्ये पाण्याची तीव्रता टंचाई आहे. संपूर्ण गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढली.
महापालिकेमार्फत टँकरद्वारे गावांना पुरवठा केला जात आहे. तेवढे पाणीही पुरत नसल्याने, सोसायटीवर स्वतंत्र इमारतींना स्वतः विकत पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेमध्ये गावे समाविष्ट झाल्यानंतर पालिकेने तत्काळ गावांवरती टॅक्स लावून टॅक्स वसुलीसुद्धा सुरू केली. मात्र त्या प्रमाणात सोयी-सुविधा देण्यास पालिका अपयशी ठरत आहे, अशी तक्रार नागरिक करत आहेत. गुजर निंबाळकरवाडी व भिलारेवाडी येथे तलाव असून, या तलावातील पाणीदेखील कमी झाले आहे. दुसरीकडे पाण्याचे टँकर मागविताना नागरिक हैराण झाले आहेत.
इथे होतो अपुरा पाणीपुरवठा-
संतोषनगर, आगम मंदिर, दत्तनगर, भारतनगर, परिसरात मोठ्या पाणीपुरवठा वाहिन्यांचे जाळे नसल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो.

या उपाययोजनांची गरज

  • गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी व भिलारेवाडी जुन्या ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेला मनपा मुख्य पाण्याची लाईन जोडून पाणी देणे.
  • वाढत्या नागरिकाला 25-30 एलएलडी पाणीपुरवठा वाढवणे.
  • कात्रजचे दोन्ही तलाव, गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी पाझर तलावाचे रुंदीकरण व गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे.
  • कात्रज व कोंढवा बुद्रुक परिसराला राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथून आगम मंदिर 24 एमएलडी, महादेवनगर, केदारेश्वर पाण्याच्या
  • टाकीमध्ये 70 एमएलडी पाणीपुरवठा होतो. या भागातील वाढते नागरिकरण पाहता किमान 25 ते 30 एमएलडी पाणी वाढवून मिळण्याची गरज आहे.
पालिका हद्दीलगतच्या गावांना पाणी देण्याची मागणी होत होती. आता ही गावे पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळा अजून दीड महिने असून, पाण्याची टंचाई आतापासूनच तीव्र झाल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
– गणेश निंबाळकर, माजी उपसरपंच.गुजर-निंबाळकरवाडी.
कात्रज, कोंढवा बुद्रुक परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. मिळणारे पाणी आणि मागणी यामध्ये तफावत होते. त्यामुळे काही भागात पाणीटंचाईच्या तक्रारी येतात. याबाबत अतिरिक्त पाणी वाढवून मिळावे, अशी मागणी होत आहे.
-नितीन खुडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news