पहिली-दुसरीच्या पुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष..! पुढे काय?

पहिली-दुसरीच्या पुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष..! पुढे काय?
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही. परंतु शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी तसेच प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2024-2025 (जून 2024) हे पहिली-दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे इयत्ता पहिली-दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या.

शैक्षणिक वर्ष 2023-2024 (जून 2023) पासून पथदर्शी स्वरूपात 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण 4 भागात उपलब्ध करून दिली आहेत. या वर्षीसुध्दा तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-2025 (जून 2024) पासून राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच खासगी व विनाअनुदानित शाळांमधील 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या माध्यमांसाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण 4 भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.

या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण 4 भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून दिली जातील, असेदेखील कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news