पवनानगर : नराधमाला फाशीच्या शिक्षेसाठी सर्वस्व पणाला लावू : अजित पवार

पवनानगर : नराधमाला फाशीच्या शिक्षेसाठी सर्वस्व पणाला लावू : अजित पवार
Published on
Updated on

पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : कोथुर्णे घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच, नराधमाला फाशीच्या शिक्षेसाठी सर्वस्व पणाला लावू, असे आश्वासन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी (दि. 6) मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात जावून पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी पवार यांनी सांगितले, की ही घटना अतिशय दुर्दैवी व मनाला सुन्न करणारी आहे.

याप्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेत व दबाव होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. या केससाठी निष्णात विशेष सरकारी वकील व फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या घटनेतील आरोपी हा गावातील असून, त्याने यापूर्वीदेखील असाच एक प्रकार केला असल्याचे ग्रामस्थांनी अजित पवार यांना सांगितले. तेव्हा पवार म्हणाले, की त्याच वेळी त्याला शिक्षा झाली असती तर आज ही घटना घडली नसती. झालेला प्रकार दुर्दैवी आहे. निष्पाप चिमुरडी आता पुन्हा येणार नसली तरी तिला न्याय मिळवून देणे व असे कृत्य करणार्‍या आरोपीला मरेपर्यत फाशी देणे गरजेचे आहे.

यामधून समाजात एक मेसेज जाईल व असे कृत्य करायला कोठे धजावणार नाही. राज्यात शक्ती कायदा कठोर करण्यासाठी विधिज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे काम सुरू आहे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचादेखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news