

पिंपरी : उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरातील 79 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी सहाच्या सुमारास प्राधिकरण, निगडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी शिशिर भास्कर भालेराव (40, रा. मांगल्य निवास, स्टर्लिंग हॉस्पिटलसमोर, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा सोमवारी रात्री साडेदहा ते मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान उघडा होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश सोन्याचे मणी मंगळसूत्र, टॉप्स, चेन व रोख रक्कम असा 79 हजारांचा ऐवज चोरून नेला.