निगडी : घोरावडेश्वर डोंगरावर वडाचे रोपण

निगडी : घोरावडेश्वर डोंगरावर वडाचे रोपण
Published on
Updated on

निगडी प्राधिकरण: येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला आणि निसर्गमित्र विभागाच्यावतीने घोरावडेश्वर डोंगरावर वडाचे रोपण करून सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिला विभाग अध्यक्ष प्रा. शैलजा सांगळे यांनी सुमारे वीस महिला आणि उपस्थित निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांच्या समवेत हरित प्रतिज्ञेचे सामुदायिक वाचन केले.

निसर्गमित्र विभागाचे ज्येष्ठ सदस्य विजय सातपुते यांनी माहिती देताना सांगितले, की तेरा वर्षांपासून ते आजतागायत निसर्गमित्र विभागाने घोरावडेश्वर डोंगरावरील दहा एकरात पंधरा हजार वृक्षांचे रोपण केले आहे. खडकाळ जमीन, वणव्यामुळे लागणार्‍या आगी आणि काही उपद्रवी व्यक्तींचा उपसर्ग या समस्यांवर मात करीत त्यापैकी बारा हजार वृक्षांचे संवर्धन केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद बन्सल, भास्कर रिकामे, दीपक नलावडे, रवींद्र मंकर, विनीत दाते यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

राजीव गांधी प्रतिष्ठानतर्फे महिलांना रोप वाटप
स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त पिंपळे गुरव येथील महिलांना 200 वृक्ष वाटप करण्यात आले. पिंपळे गुरव येथील महादेव मंदिर, तुळजाभवानी मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास संदेशकुमार नवले, राजेश कदम, हिरामण देवकर, प्रकाश ढमाले, प्रतिक नवले आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news