नगर रोड, वडगाव शेरी, चंदननगर, भागात अपघात

कल्याणीनगर येथील अ‍ॅडलॅब चौकात पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
कल्याणीनगर येथील अ‍ॅडलॅब चौकात पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: नगर रोड, कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरी, चंदननगर भागातील काही रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांचे नुकसान होत आहे. पावसामुळे नगर रोड, कल्याणीनगर येथील गोल्ड अ‍ॅडलॅब चौक, शास्त्रीनगर चौक, वडगाव शेरीतील विद्यांकुर शाळा, छत्रपती संभाजी महाराज चौकातील पंपिग स्टेशन, विमाननगर येथील साकोरेनगर रस्ता, दत्त मंदिर चौक, गणेशनगर सर्व्हे नं. 48 मधील अंतर्गत रस्ते, वडगाव शेरी आणि चंदननगरमधील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहे.

तसेच ओबडधोबड किंवा उंच-सखल रस्ते, रस्त्यांवरील खराब डांबरीकरण, वाळू आणि खडी अनेक रस्त्यांवर आहे. यामुळे रस्त्यावरून वाहने चालविणे कसरत झाली आहे. खड्ड्यांतून वाहने चालविल्यामुळे दुचाकीस्वारांना मणक्यांचे आजार होत आहेत. खड्डयांमुळे गाडीचे नुकसान होत आहे. महापालिकेने काही ठिकाणी डांबर टाकून खड्डे बुजविले होते. मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे कल्याणीनगर, विमाननगरमधील अंतर्गत रस्त्यांवर मेनहोल्समुळे अनेक खड्डे तयार झाले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नाहीत. या नादुरुस्त मेनहोल्समुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व मेनहोल्स त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news