धुमाळवाडीत अवकाळीची जोरदार हजेरी; वादळी वार्‍याने ऊस पिके भुईसपाट

धुमाळवाडीत अवकाळीची जोरदार हजेरी; वादळी वार्‍याने ऊस पिके भुईसपाट

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : धुमाळवाडी (ता. शिरूर) येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, वादळी वार्‍याने ऊस पिके भुईसपाट झाली आहेत. मागील आठवडाभरात शिरूर तालुक्यात तापमानाचा उच्चांक नोंदवला असून उन्हाने जिवाची काहिली होत आहे. बुधवारी (दि. 24) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वार्‍याला सुरुवात झाली.

यानंतर सुमारे एक ते दीड तास जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळात शिरसगाव काटा, धुमाळवाडी परिसरात ऊस पीक भुईसपाट झाले, तर मका, कडवळ या पिकांना फटका बसला. कांदा काढणीला आला असताना अनेकांचा कांदा जागीच भिजला तर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. या वादळी वार्‍यात स्थानिक शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news