

मंचर : देवगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदीकाठावरील शेतकर्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीला गेल्या आहेत. चोरीने 5 शेतकर्यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. बहुतांश शेतकर्यांनी नदीकाठावर मोटरी बसवल्या आहेत. मात्र वारंवार वीज पंपाची व केबलची चोरी होत असल्याने शेतकरी वैतागला आहे.