

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुण्याहून मुंबईला जाणार्या इंद्रायणी एक्सप्रेसच्या पॅसेंजर डब्यातून एका व्यक्तीकडून प्राण्यांची वाहतूक करण्यात येत होती. त्याला रेल्वे प्रशासनाने 2 हजार 185 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्याला कर्जत स्थानकावर गाडीतून उतरविण्यात आले.
रेल्वेच्या पॅसेंजर डब्यातून प्राण्यांची वाहतूक करण्यास परवानगी नाही. मात्र, बुधवारी एक व्यक्ती आपल्यासोबत एक बोकड घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.
त्याला प्रवाशांनी विरोध केला आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. रेल्वेतून प्राण्यांना घेऊन जायचे असेल तर त्याकरिता गार्डजवळ वेगळा डबा ठेवण्यात आला आहे. यासाठी प्रवाशांना पार्सल ऑफिसमधून बुकिंग करावे लागते. मात्र असे न करताच ही व्यक्ती पॅसेंजर डब्यातून प्राणी घेऊन जात होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाई केली.